पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्विटरचे सर्वेसर्वा एलन मस्क यांच्यात भेट; नेमकी काय चर्चा?

PM Narendra Modi Meets Elon Musk : मोदी आणि एलन मस्क यांच्या भेटीचा हा फोटो पाहिलात का?; पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यातील मोठी अपडेट...

| Updated on: Jun 21, 2023 | 9:06 AM
1 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांचं अमेरिकेत उत्साहात स्वागत करण्यात आलं.

2 / 5
पंतप्रधान मोदी या अमेरिका दौऱ्यात अनेक उद्योगपती, स्थानिक नेते अन् उच्च पदस्थ लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत.

3 / 5
पंतप्रधान मोदी यांनी या अमेरिका दौऱ्यात ट्विटरचे सर्वेसर्वा एलन मस्क यांची भेट घेतली. एलन मस्क यांची इलेक्ट्रॉनिक कार कंपनी आहे.

4 / 5
मोदींनी या भेटीचा फोटो शेअर केला आहे. ही भेट अतिशय चांगली राहिली. ऊर्जेपासून ते अध्यात्मापर्यंतच्या मुद्द्यांवर आमची दिलखुलास चर्चा झाली, असं मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

5 / 5
मोदींनी उद्योगपती रे डलियो यांचीही भेट घेतली आहे. भारतातील गुंतवणुकीला अधिक वाढवण्याच्या मुद्द्यावर आमची चर्चा झाली, असं मोदी यांनी ट्विट केलं आहे.