पंतप्रधान मोदींकडून महात्मा गांधी यांना अभिवादन; म्हणाले, बापू, तुमचं बलिदान…

PM Narendra Modi tribute to Mahatma Gandhi at Rajghat : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजघाटावर गेले. तिथे जात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्र्पिता गांधी यांना नमन केलं... त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं. तसंच ट्विट करत त्यांनी बापूंना अभिवादन केलंय. पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले? वाचा...

आयेशा सय्यद | Updated on: Jan 30, 2024 | 12:38 PM
1 / 5
जगाला सत्य, अहिंसा आणि शांतीचा मार्ग दाखवणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी... महात्मा गांधी यांच्या विचारांना, त्यांच्या तत्वांना आज अनेकजण अभिवादन करत आहेत. देशभरातून त्यांना नमन केलं जातंय.

जगाला सत्य, अहिंसा आणि शांतीचा मार्ग दाखवणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी... महात्मा गांधी यांच्या विचारांना, त्यांच्या तत्वांना आज अनेकजण अभिवादन करत आहेत. देशभरातून त्यांना नमन केलं जातंय.

2 / 5

राजधानी दिल्लीत राजघाटावर महात्मा गांधी यांची समाधी आहे. त्या ठिकाणी जात अनेकांनी बापूंना अभिवादन केलं. पंतप्रधान मोदीही तिथे गेले होते.

3 / 5

राजघाटावर जात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांना अभिवादन केलं. त्यांच्या स्मृतींना पुष्पांजली अर्पण केली.

4 / 5

राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू, भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही महात्मा गांधी यांना अभिवादन केलं. यावेळी बापूंच्या स्मृतींना पुष्पही अर्पण करण्यात आले.

5 / 5

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. आपल्या देशासाठी शहीद झालेल्या सर्वांना मी श्रद्धांजली वाहतो. गांधीजींचं बलिदान आम्हाला लोकांची सेवा करण्यासाठी, आपल्या देशासाठी त्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देतात, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us