- Marathi News Photo gallery Political photos Devendra fadnavis batting during bjp mla kalidas kolambakars aamdar chashak cricket competition
बॅटिंगला मजा येते, मी बोलिंगही बॉडीलाईनने करत नाही, समोरच्याची अडचण होते : देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना क्रिकेटमधील (Cricket) फटकेबाजीला जोडून सध्याच्या राजकीय फटकेबाजीबद्दल विचारलं.

भाजप आमदार कालिदास कोळंबकर (BJP MLA Kalidas Kolambakar) यांच्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपस्थिती लावली.

या स्पर्धेचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी फलंदाजीत हात आजमावला. एखादा बॉल हुकला, मात्र फडणवीसांनी बोलिंगवर जोरदार टोलेबाजी केली.

या सामन्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांना मीडियाने गाठलं. देवेंद्र फडणवीस यांना क्रिकेटमधील फटकेबाजीला जोडून सध्याच्या राजकीय फटकेबाजीबद्दल विचारलं.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, "क्रिकेट खेळताना मजा येते, त्यात बॅटिंग करायला आणखी मजा येते. मी बॉडीलाईन बोलिंग करत नाही. मी अतिशय लॉजिकल ऑन द स्टम्प बोलिंग करतो आणि माझा शॉर्टपिचही बॉल नसतो. योग्य टाकत असतो.

समोरच्यांना बॅटिंग करताना, तो बॉल खेळताना अडचण होते, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.