AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जरांगे यांच्या नंतर संजय राऊतांचा सकाळी सकाळीच नवा बॉम्ब, विधान परिषद निवडणुकीत…

विधान परिषद निवडणुकीत मतदारांना प्रत्येकी ₹10 हजार रुपये वाटल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात मतदारांना पैसे दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. राऊत यांनी भाजप, शिंदे गट आणि फडणवीस सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करत लोकशाही विकत घेतल्याचा दावा केला.

जरांगे यांच्या नंतर संजय राऊतांचा सकाळी सकाळीच नवा बॉम्ब, विधान परिषद निवडणुकीत...
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 23, 2026 | 12:28 PM
Share

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी आज राज्यात मतदान होत आहे. या निवडणुकीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या निवडणुकीत महायुतीची सरशी होणार की महाविकास आघाडीची? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. राज्यात निवडणुकीची लगबग सुरू असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा बॉम्ब फोडला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने मतदारांना प्रत्येकी 10-10 हजार रुपयांचं वाटप केलं आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या आरोपांनी एकच खळबळ उडाली आहे. काल मनोज जरांगे यांनी मोठा बॉम्ब फोडल्यानंतर आता संजय राऊत यांनीही मीडियाशी बोलताना मोठा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

मनोज जरांगे यांनी 500 कोटी रुपयांचा गौप्यस्फोट केला आहे. यातून एक स्पष्ट होतंय. शिंदे आणि फडणवीस हे एकमेकांवर तलवार चालवत आहे. यातून एका दगडात तीन पक्षी मारले आहेत. जरांगेंना बदनाम करायचं आणि फडणवीस आणि शिंदेंना गोत्यात आणायचं हा यामागचा हेतू आहे. ज्याने ऑडिओ क्लिप काढली त्याला माहीत आहे, मी तर मरणार आहे. पण तुला साथ घेऊन बुडणार. अशा पद्धतीचा हा खेळ सुरू आहे. दुष्काळावर कोणी बोलत नाही. पदवीधरांचे मत 10 हजाराला विकत घेतलं जात आहे. मतदारांना प्रत्येकी 10-10 हजार रुपये देण्यात आले आहेत. भाजपने हे दिले आहेत. पण शेतकऱ्यांना फक्त 5 हजार रुपये दिले जात आहेत. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात काल परवापासून प्रत्येकी 10 हजार रुपये वाटले जात आहेत. भाजपचे उमेदवार आहे, तिथे हे वाटप होत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

आम्ही त्यावर बोलायचं नाही का?

जे 500 कोटी जमा झाले आहेत, त्यातून मतं विकत घेणं, पक्ष विकत घेणं सुरू आहे. जरांगेंचं आंदोलन संपवण्यासाठी हा खेळ सुरू झाला आहे, असा दावाही राऊत यांनी केला आहे. आपण पैशाने सर्व काही विकत घेऊ शकतो. पक्ष, आमदार खासदार आणि माणसंही, असं सत्ताधाऱ्यांना वाटत आहे. भाजप आणि शिंदे गटाकडे हा भ्रष्टाचाराचा पैसा आहे. आम्ही आंदोलन केलं तर आम्हाला देशद्रोही ठरवलं जातं. आम्हाला चिरडलं जातं. आम्हाला तुरुंगात टाकलं जातं. त्यावर आम्ही बोलायचं नाही? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

मोदी, शाह डरपोक हुकूमशाह

दिल्लीच्या बीकानेर हाऊसमधील प्रदर्शनातून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे चिरंजीव रेहान वाड्रा यांनी काढलेले फोटो हटवण्यात आले आहेत. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकार आंदोलनाला घाबरतंय. आता आंदोलनाच्या फोटोलाही सरकार घाबरत आहे. ही हिटलर टाइप सेन्सॉरशीप आहे. रेहान याने काही आंदोलनातील रिअॅक्शन त्याच्या कॅमेऱ्यात टिपल्या आहेत. अत्याचाराच्या आणि वेदनेच्या या रिअॅक्शन आहेत. ही कला आहे. जगात युद्ध झाले,. वर्ग कलह झाले. धार्मिक कलह झाले, त्या प्रत्येक ठिकाणी फोटोग्राफर पोहोचले होते. त्यांनी त्याचे फोटो काढले होते. अगदी गाजापट्टीतही फोटो काढून त्याचं प्रदर्शन भरवलं गेलंय. पण मोदी आणि शाह हे डरपोक हुकूमशाह आहेत. तरुण कलाकाराच्या फोटोला घाबरले आहेत, असा हल्लाच त्यांनी चढवला.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख....
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख 15 हजार 697 शेतकऱ्यांना मिळणार लाभ
7 महिन्यांपासून पगार नाही; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
Pune : 7 महिन्यांपासून पगार नाही, 230 कामगार संकटात; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
Dilip Lande : शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मास्तर ढसाढसा रडले
NCP : नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मतदानाच्या काही तास आधी...कराळे मास्तर ढसाढसा रडले, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल...
Sanjay Raut : 500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल; अमित शहा, फडणवीस अन् शिंदेंना काय दिलं आव्हान
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?