AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tiger Shroff Case : डिलिव्हरी एजंट ते बाईक… टायगर श्रॉफच्या हल्लेखोराबद्दल नवी अपडेट समोर

Tiger Shroff Case : अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबार झाल्यानंतर पोलीस कसून चौकशी करत आहेत. आता अभिनेत्याच्या हल्लेखोराबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.. या हल्ल्यासाठी मुंबईत वर्षभरापासून मोठ्या हलचाली सुरु होत्या...

Tiger Shroff Case : डिलिव्हरी एजंट ते बाईक... टायगर श्रॉफच्या हल्लेखोराबद्दल नवी अपडेट समोर
Tiger Shroff
| Updated on: Oct 23, 2026 | 12:29 PM
Share

Tiger Shroff Case : अभिनेता टायगर श्रॉफ याच्या जुहू परिसरातील कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत आतापर्यंत जळपसा 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत. तर प्रकरणातील आरोप हृतिक याच्याबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी हृतिक मुंबईत वर्षभरापासून बिश्नोई गँगसाठी स्लीपर ऑपरेटिव्ह म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. तपास अधिकाऱ्यांना संशय आहे की, आरोपी हृतिक जवळपास वर्षभरापासून मुंबईत लॉरेन्स बिश्नोई गँगसाठी काम करत होता. गोळीबाराच्या घटनेप्रकरणी कोटा येथून अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींपैकी हृतिक एक आहे.

सूत्रांनुसार, कोणाचंही लक्ष वेधून न घेता मुंबईत फिरण्यासाठी हृतिक रॅपिडो रायडर असल्याचं भासवत असे. शिवाय, आपल्या कामाच्या नावाखाली, तो बॉलिवूड सेलिब्रिटी राहत असलेल्या उच्चभ्रू वस्त्यांमध्ये पाळत ठेवत असे. सूत्रांच्या दाव्यानुसार, त्याने या ठिकाणांचे व्हिडिओ रेकॉर्ड करून ते बिश्नोई गँगच्या सदस्यांना पाठवलं होतं. अंधेरी पूर्व येथील भाड्याच्या घरात राहायला जाण्यापूर्वी, हृतिकने जुहू आणि गोरेगाव येथे अनेक महिने वास्तव्य केलं होतं.

जुहूमध्ये वास्तव्यादरम्यान, संशय टाळण्यासाठी आणि मुंबईत आपली उपस्थिती सिद्ध करण्यासाठी त्याने स्थानिक पत्त्याचा वापर करून आधार कार्ड मिळवलं होतं. तपासकर्त्यांना संशय आहे की, डिलिव्हरी एजंट आणि बाईक-टॅक्सी रायडर म्हणून केलेल्या कामामुळे त्याला सेलिब्रिटी, त्यांची दैनंदिन दिनचर्या आणि त्यांच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा व्यवस्थेबद्दल माहिती गोळा करत मुक्तपणे फिरता येत होते.

सूत्रांनुसार, हृतिकला त्याचा खर्च भागवण्यासाठी आणि मुंबईत राहण्यासाठी पैसे मिळत होते. त्याला भविष्यात एक मोठे काम देण्याचं आणि त्यासोबतच मोठी रक्कम कमावण्याची संधी देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. टायगर श्रॉफला लक्ष्य करण्याच्या कटातील त्याची कथित भूमिका त्या आश्वासनाशी जोडलेली होती का, याचा तपास आता तपासकर्ते करत आहेत. कोटा येथे हृतिकला अटक केल्यानंतर, मुंबईतील टोळीचे कार्यप्रणालीचे जाळे उघड करण्यासाठी आणि त्यात सामील असलेल्या इतर व्यक्तींना ओळखण्यासाठी मुंबई पोलीस त्याची चौकशी करत आहेत. आता याप्रकरणी पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो - राज ठाकरे
Raj Thackeray : मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो; राज ठाकरेंचा दुष्काळावरून इशारा
AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; ऑडिओ क्लिपवरून जरांगे संतप्त
Manoj Jarange Patil : AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; कथित ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे पाटील संतप्त
जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले....
CM Devendra Fadnavis : जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले, संपूर्ण फॉरेन्सिक तपासणी...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख....
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख 15 हजार 697 शेतकऱ्यांना मिळणार लाभ
7 महिन्यांपासून पगार नाही; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
Pune : 7 महिन्यांपासून पगार नाही, 230 कामगार संकटात; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
Dilip Lande : शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मास्तर ढसाढसा रडले
NCP : नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मतदानाच्या काही तास आधी...कराळे मास्तर ढसाढसा रडले, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल...
Sanjay Raut : 500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल; अमित शहा, फडणवीस अन् शिंदेंना काय दिलं आव्हान
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा