गुजरातचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या कुटुंबात कोण-कोण आहे? वाचा

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले. ज्यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे निधन झाले आहे. रुपाणी हे त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी लंडनमध्ये जात होते. त्यांच्या कुटुंबाबद्दल माहिती जाणून घेऊयात.

Updated on: Jun 13, 2025 | 5:36 PM
1 / 10
विजय रुपानी यांचा जन्म २ ऑगस्ट १९५६ रोजी म्यानमारमधील यांगून येथे झाला. त्यांच्या आईचे नाव मायाबेन आणि वडिलांचे नाव रमणिकलाल रुपाणी होते.

2 / 10
रुपाणी कुटुंब १९६० मध्ये म्यानमारहून राजकोटला स्थलांतरित झाले, त्यानंतर विजय यांनी सौराष्ट्र विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी एलएलबीचे शिक्षण घेतले.

3 / 10
विजय रुपाणी यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) शी संबंधित कारकिर्दीची सुरुवात केली. विद्यार्थी कार्यकर्ते म्हणून काम केले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मध्ये सामील झाले आणि नंतर १९७१ मध्ये जनसंघात सामील झाले.

4 / 10
विजय रुपाणी यांनी महिला शाखेची सदस्य अंजली यांच्याशी लग्न केले होते. आणीबाणीत त्यांना ११ महिने तुरुंगात ठेवण्यात आले होते. ते १९७८ ते १९८१ पर्यंत संघाचे प्रचारक होते.

5 / 10
विजय रुपाणी १९८८ ते १९९६ पर्यंत आरएमसीच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी १९९६ ते १९९७ पर्यंत राजकोटचे महापौर म्हणून काम केले.

6 / 10
२००६ ते २०१२ पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते. नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी भाजपच्या गुजरात युनिटचे सरचिटणीस म्हणून चार वेळा काम केले.

7 / 10
ऑगस्ट २०१४ मध्ये, गुजरात विधानसभेचे तत्कालिन अध्यक्ष आणि राजकोट पश्चिमचे आमदार वजुभाई वाला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तेव्हा भाजपने त्यांच्या जागी विजय रूपाणी यांना उमेदवारी दिली, ज्यात त्यांनी विजय मिळवला.

8 / 10
१९ फेब्रुवारी २०१६ रोजी, रूपाणी आर. सी. फड्डू यांच्या जागी प्रदेश भाजप अध्यक्ष झाले. ते फेब्रुवारी २०१६ ते ऑगस्ट २०१६ पर्यंत भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते.

9 / 10
विजय रुपाणी यांनी ७ ऑगस्ट २०१६ रोजी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. २०१८ मध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. ११ सप्टेंबर २०२१ पर्यंत ते मुख्यमंत्री पदावर होते.

10 / 10
विजय रुपाणी यांनी महिला शाखेची सदस्य अंजली यांच्याशी लग्न केले होते. या जोडप्याला ऋषभ नावाचा मुलगा आणि राधिका नावाची मुलगी आहे, जी विवाहित आहे. या जोडप्याने त्यांचा धाकटा मुलगा पुजितचे अपघातात निधन झालेले आहे.