एकच सिंह पद्मसिंह, माझा तेरणेचा वाघ आला, डॉ. पद्मसिंह पाटलांचं पुष्पाताईंसोबत रक्षाबंधन

डॉ पद्मसिंह पाटील हे राज्याचे माजी गृहमंत्री असून त्यांनी गेल्या 60 वर्षाच्या राजकारणात ऊर्जा, पाटबंधारे मंत्री अशी पदे भूषवली आहेत, तर त्यांच्या बहीण पुष्पाताई या उस्मानाबाद नगर परिषदेच्या नगराध्यक्षा राहिल्या आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Publish Date - 1:45 pm, Sun, 22 August 21
1/5
एकच सिंह पद्मसिंह, माझा तेरणेचा वाघ आला, असे म्हणत पुष्पाताई पाटोदेकर यांनी डॉ. पद्मसिंह पाटील यांचे स्वागत केले आणि रक्षाबंधन साजरा केला. डॉ पद्मसिंह पाटील हे राज्याच्या राजकारणातील एक मोठे प्रस्थ आहेत.
2/5
डॉ पद्मसिंह पाटील हे राज्याचे माजी गृहमंत्री असून त्यांनी गेल्या 60 वर्षाच्या राजकारणात ऊर्जा, पाटबंधारे मंत्री अशी पदे भूषवली आहेत, तर त्यांच्या बहीण पुष्पाताई या उस्मानाबाद नगर परिषदेच्या नगराध्यक्षा राहिल्या आहेत
3/5
डॉ पद्मसिंह पाटील बहीण पुष्पाताई पाटोदेकर यांच्या उस्मानाबाद येथील घरी गेले होते. यावेळी त्यांनी एकमेकांना पेढा भरवून औक्षण केले.
4/5
82 वर्षांच्या डॉ पद्मसिंह पाटील यांनी 83 वर्षीय बहिणीच्या हातून राखी बांधून घेत आशीर्वाद घेतले.
5/5
यावेळी डॉ पाटील यांचे भाचे अमोल पाटोदेकर, भाची अस्मिता पाटील यांच्यासह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. डॉ. पाटील भाऊ बहीण यांचे एकमेकांवरील प्रेम, आपुलकी पाहून वातावरण भावनिक झाले होते.
Ads By Adgebra

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे. निवडीबाबतचं पत्र रुपाली चाकणकर यांना आज मिळालं. चाकणकर या अध्यक्षपदाची जबाबदारी उद्या स्वीकारणार आहेत.