
इंडिया आघाडीच्या बैठकीतील दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली आहे. या बैठकीवेळी उपस्थित सर्व नेत्यांनी एकत्रित फोटोसेशन केलं.

सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, नीतीश कुमार, लालू प्रसाद यादव, ममता बॅनर्जी, मेहबूबा मुफ्ती यांच्यासह देशभरातील नेते या फोटोत दिसत आहेत.

जयंत पाटील, सुप्रिया सुळे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यासह राज्यातील इतर नेतेही या फोटोत आहेत.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना एकाच फ्रेममध्ये कॅच करण्यात आलं.

ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी यांना शाल देत स्वागत केलं. यावेळी उद्धव ठाकरे, राहुल गांधी देखील उपस्थित होते.