तुम्ही कधी सिनेमात काम केलंय का?, चिमुरड्याने प्रश्न विचारला, नेहरूही हसत उत्तरले, म्हणाले…

जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त काही खास फोटो...

आयेशा सय्यद | Updated on: Nov 14, 2022 | 10:34 AM
1 / 7
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू जितके राजकारणात मुरलेले होते.तितकंच ते लहान मुलांच्या विश्वात रमायचे. या लहान मुलांसोबत तासनतास गप्पा मारायला नेहरूंना आवडायचं.

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू जितके राजकारणात मुरलेले होते.तितकंच ते लहान मुलांच्या विश्वात रमायचे. या लहान मुलांसोबत तासनतास गप्पा मारायला नेहरूंना आवडायचं.

2 / 7

त्यांना जितका लहान मुलांचा लळा होता, तितकंच या लहान मुलांचही आपल्या नेहरू चाचांवर प्रेम होतं.

3 / 7

4 / 7

नेहरू एकदा असंच या लहान मुलांशी गप्पा मारत होते. लहान मुलांसाठी सिनेमा आणावेत का? आणायचे असतील तर कुठले सिनेमे आणावेत? एखाद्या सिनेमात कुठकुठल्या बाबी असाव्यात? मुलांना काय अपेक्षित आहे? याविषयी ते या मुलांशी चर्चा करत होते.

5 / 7

या चर्चे दरम्यान एका मुलाने 'तुम्ही कधी सिनेमात काम केलं आहे का?', असा प्रश्न केला. त्यावर नेहरू हसले आणि म्हणाले 'आता तुमच्यासाठी सिनेमा आणतोय ना...' त्यावर एकच हशा पिकला. त्याच संवादादरम्यानचा हा फोटो...

6 / 7

नेहरू आपल्या नातवांनाही आवर्जून वेळ द्यायचे. राजीव गांधी आणि संजय गांधी यांच्यासोबत फेरफटका मारतानाचा हा फोटो...

7 / 7

जवाहरलाल नेहरू आणि लहान मुलांचं खास नातं होतं. त्याचमुळे त्यांना नेहरू चाचा म्हटलं जायचं.आता त्यांची जयंती बालदिन म्हणून साजरी केली जाते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us