
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या जपानच्या दौऱ्यावर आहेत. 21 ते 25 ऑगस्ट हे पाच दिवस फडणवीस जपानमध्ये असतील.

राजदूत सिबी जॉर्ज आणि त्यांच्या पत्नी जॉईस सिबी यांनी देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं.

देवेंद्र फडणवीस जपानमध्ये पोहोचताच त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी भारतीयांनी गर्दी केली.

देवेंद्र फडणवीस हे जपानमध्ये पोहोचताच फेटा बांधत आणि औक्षण करत पारंपरिक पद्धतीने त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.

माझ्यावर केलेल्या प्रेमवर्षावाने मी अतिशय सुखावलो आहे. खूप खूप धन्यवाद जपान या आतिथ्य आणि प्रेमासाठी!, असं म्हणत फडणवीस यांनी स्वागतासाठी आभार मानलेत.