
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. याचे फोटो सिद्धरामय्या यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी विविध मुद्द्यांवर बातचित केल्याचं सिद्धरामय्या यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली, असं सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे.

देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेत एअर शो आयोजित करण्यासंदर्भातत चर्चा केल्याचं सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचीही सिद्धरामय्या यांनी भेट घेतली.