
नितीन गडकरी यांच्या घराबाहेर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यावेळी मोठा तणाव पाहायला मिळालाय.

यावेळी भाजप कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांसोबत काही काळ धक्काबुक्की झाली. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

नितीन गडकरी यांनी मोदींना आवाहन करावं आणि महाराष्ट्राची माफी मागण्याची मागणी करावी, असं म्हणत काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्लोबल केलाय.

लोकसभेत, राज्यसभेत महाराष्ट्राबाबात केलेल्या वक्तव्याविरोधात काँग्रेसनं राज्यभर मोदींचा निषेध केला होता. आज नागपुरात वाद पेटल्याचं यावेळी बघायला मिळालं.

भाजप कार्यकर्ते यांचा आक्रमक पवित्रा यावेळी बघायला मिळाला. बॅरिकेट्स काढून कार्यकर्तेंनी पोलिसांना न जुमानता पुढे जाण्याचा प्रयत्न केला.

नितीन गडकरी यांच्या घराबाहेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांआधीच भाजपचे कार्यकर्ते दाखल झाले होते.

दरम्यान, भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर उभे ठाकल्यानंतरत एकच घोषणाबाजी आणि धक्काबुक्की झाल्याचं दिसून आलंय.

मागच्या पन्नास वर्षात काहीही न केलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन मोडून काढण्यासाठी भाजप कार्यकर्ते तोडीसतोड प्रत्युत्तर देतील असं यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी म्हटलंय.