
मुंबई : सध्या गणेशोत्सवाची धूम आहे. महाराष्ट्रात घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातोय.

टीव्ही 9 मराठीच्या कार्यालयातदेखील बाप्पाचे आगमन झाले आहे.

आज (14 सप्टेंबर) बाप्पाच्या पूजनासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित टीव्ही 9 मराठीच्या कार्यालयात उपस्थित राहिले.

त्यांनी टीव्ही 9 मराठीच्या कार्यालयाला भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेतले.

तसेच गणरायाची मनोभावे पूजा करुन महाराष्ट्र कोरोना महामारीतून लवकरात लवकर मुक्त व्हावा अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली.तसेच गणरायाची मनोभावे पूजा करुन महाराष्ट्र कोरोना महामारीतून लवकरात लवकर मुक्त व्हावा अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली.

गणरायाची पूजा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेला तसंच टीव्ही 9 मराठीच्या दर्शकांना, गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.