
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागात दौरा करत होत्या. शिवशक्ती परिक्रमा यात्रा त्यांनी काढली.

4 सप्टेंबरला वेरूळच्या घृष्णेश्वराचं दर्शन घेत पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती परिक्रमा यात्रेची सुरूवात केली.

आज या यात्रेचा समारोप झाला. परळीत आज या यात्रेची सांगता झाली. परळीतील वैद्यनाथाचं दर्शन घेत त्यांनी यात्रेचा समारोप केला.

पंकजा मुंडे यांनी आपल्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे यांच्यासोबत वैद्यनाथाच्या मंदिरात विधिवत अभिषेक, पूजा केली.

या शिवशक्ती परिक्रमा यात्रेचा समारोप होत असताना पंकजा मुंडे भावूक झाल्या. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.