Rohit Pawar : युवा संघर्ष यात्रेला सुरुवात; शेकडो तरुणांसह रोहित पवार यांची पदयात्रा
MLA Rohit Pawar Yuva Sangharsh Yatra Pune To Nagpur : कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष या पदयात्रेला सुरुवात झाली आहे. आजपासून 7 डिसेंबरपर्यंत ही पदयात्रा असेल. आज पुण्यातून या यात्रेला सुरुवात झाली. या पदयात्रेतील काही निवडक फोटो... पाहा...

कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या आजपासून युवा संघर्ष पदयात्रेला सुरुवात झाली आहे. पुण्यातून या संघर्षयात्रा सुरु झाली आहे.

पुणे ते नागपूर असं 800 हून अधिक किलोमीटरची ही पदयात्रा असणार आहे. यात कोणताही राजकीय मुद्दा नसून युवकांच्या प्रश्नांना घेऊन आपण रस्त्यावर उतरल्याचं रोहित पवार यावेळी म्हणाले.

रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने शरद पवारांची पुण्यात आशीर्वाद सभा झाली. पुण्यातील टिळक स्मारक हॉलमध्ये सभा पार पडली. सभेआधी जेसीबीने पुष्पवृष्टी करत शरद पवार यांचं स्वागत केलं गेलं.

महात्मा फुले-सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला रोहित पवार यांनी भेट दिली. त्यांना अभिवादन केलं अन् या यात्रेला सुरुवात केली. आजपासून 7 डिसेंबरपर्यंत ही पदयात्रा असणार आहे.

या पदयात्रेला सुरुवात करण्याआधीचे फोटो रोहित पवार यांनी शेअर केलाय. यात आपण घरातील लोकांचे आशिर्वाद आणि शुभेच्छा घेतल्याचं रोहित पवार म्हणाले.