Raksha Bandhan 2023 : सण भावा बहिणीच्या प्रेमाचा; पाहा पॉलिटिकल रक्षाबंधन…

Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधन म्हणजे भावा बहिणीच्या प्रेमाचा सण... भावंडांमधील प्रेम व्यक्त करण्याचा आणखी वृद्धिंगत होण्याचा हा दिवस... या दिवशी बहिण भावाला राखी बांधते. तर भाऊ तिला भेटवस्तू देतो. राजकीय मंडळींनीदेखील रक्षाबंधन सण साजरा केला. पाहा काही निवडक फोटो...

आयेशा सय्यद | Updated on: Aug 30, 2023 | 2:07 PM
1 / 5
भाजपा प्रदेश सोशल मिडिया पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा पार पडली. यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधण्यात आली.

भाजपा प्रदेश सोशल मिडिया पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा पार पडली. यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधण्यात आली.

2 / 5

ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही रक्षाबंधन साजरं केलं. याचा फोटो अंबादास दानवे यांनी शेअर केलाय.

3 / 5

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना राखी बांधली. भावा बहिणीच्या नात्यातील हा हळवे क्षण चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

4 / 5

बीजमाता पद्मश्री राहिताई पोपेरे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना धान्याची राखी पाठवली आहे. यावेळी तुमचा वसा पुढे सुरू ठेवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील, असा शब्द चंद्रकांत पाटलांनी दिला.

5 / 5

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून एक धागा मायेचा हा उपक्रम राबवण्यात आला. या अंतर्गत रुपाली चाकणकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी रक्षाबंधन सण साजरा केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us