
काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' सध्या सुरु आहे. यात अनेक लोक सहभागी होत आहेत.

सध्या ही भारत जोडो यात्रा तेलंगणामध्ये आहे. या यात्रेदरम्यान रोहित वेमुलाची आई राधिका वेमुला यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये पीएचडीचं शिक्षण घेत असताना रोहितने आत्महत्या केली होती. त्याच्या मृत्यूनंतर मोठं आंदोलन उभं राहिलं होतं.

रोहित वेमुलाच्या न्यायासाठी त्यांची आई देत असलेला अन्यायाच्या विरोधातला लढा संघर्षणाचं प्रतिक आहे.रोहितच्या आईला भेटून या यात्रेच्या उद्देशाच्या जवळ जायचं साहस आणि शक्ती मिळेल, असं म्हणत राहुल गांधी यांनी फोटो शेअर केलेत.

काही दिवसांआधी गौरी लंकेश यांच्या आई आणि बहिणीनेही भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांची भेट घेतली होती.

पक्षाला तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेसने 'भारत जोडो यात्रा' सुरु केली आहे. सध्या ही यात्रा तेलंगणामध्ये आहे. लवकरच ही यात्रा महाराष्ट्रात येणार आहे.