
कर्नाटकातील बंगळुरुमध्ये विरोधी पक्षांची बैठक होत आहे. या बैठकीला देशातील विरोधी पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित आहेत.

सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे दाखल झाले तेव्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्वागत केलं.

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या बैठकीला हजर आहेत. सोनिया गांधी यांच्यासोबत त्यांची 20 मिनिटे चर्चा झाली.

बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमारही या बैठकीला हजर आहेत.

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव हेदेखील बैठकीला उपस्थित आहेत.

पीडीपीच्या नेत्या महबूबा मुफ्ती या देखील कर्नाटकात आहेत.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार, ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधी यांचा या बैठकी दरम्यानचा हा फोटो...