युवराज संभाजीराजे छत्रपती यांचं कोल्हापुरात जंगी स्वागत! पाहा खास Photo

| Updated on: Mar 11, 2022 | 7:29 PM

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या संभाजीराजेंच्या सगळ्या मागण्या महाविकास आघाडी सरकारनं मान्य करत त्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलंय. आझाद मैदानातील उपोषण सोडल्यानंतर संभाजीराजे यांचं कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात आलं.

1 / 6
कोल्हापूर शहरात येताच युवराज संभाजीराजे छत्रपतींचं जंगी स्वागत करम्यात आलं. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.

2 / 6
निशाणाचा हत्ती, घोडे, रणभेदी गर्जना करणारे धनगरी ढोल व ढोलताशा पथक तसेच टाळ मृदंगाचा गजर करणारे वारकरी यांनी स्वागताच्या मिरवणुकीत विशेष रंग भरले होते.

3 / 6
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती ताराबाई महाराणीसाहेब, क्रांतिवीर छत्रपती चिमासाहेब महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महाराणी लक्ष्मीबाई तथा आईसाहेब महाराज व शाहूपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या शहरातील स्मारकांसह कोणतेही काम करण्यामागचा हेतू प्रामाणिक आणि विचार स्वच्छ असेल, तर कोल्हापूरकर त्याला नेहमीच पाठबळ देतात ; याचा प्रत्यय काल पुन:श्च एकदा आला, असं संभाजीराजेंनी म्हटलंय.

4 / 6
आझाद मैदानावरील उपोषणानंतर गुरुवाती प्रथमच कोल्हापूरात आले असता संभाजीराजेंचं कोल्हापूरकरांनी अत्यंत उत्साहात  स्वागत केलं होतं.

5 / 6
कोल्हापूरकरांचे  प्रेम आणि जिव्हाळा पाहून संभाजीराजेही भारावून गेले होते.

6 / 6
ज्या समाजबांधवांच्या न्यायासाठी मी उपोषण केले त्यामध्ये सर्व समाजबांधव माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याबद्दल त्यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली.