
'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत मंजिरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा बिरारी खऱ्या आयुष्यात नुकतीच लग्नबंधनात अडकली. महाराष्ट्राचे लाडके भावोजी अर्थात आदेश बांदेकरांची ती सून झाली आहे.

आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकरशी तिने लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याचे बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा पूजा नवरीच्या रुपात नटली आहे.

पूजा बिरारीचे वधूच्या रुपातील हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. लग्नानंतर आता पुन्हा एकदा ती नवरीसारखी का नटली आहे, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. यामागचं कारण म्हणजे, पूजा तिच्या मालिकेसाठी नटली आहे.

'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत राया आणि मंजिरीच्या लग्नाची लगबग सुरु आहे. राया आणि मंजिरीचा लग्नातील लूक समोर आला आहे. या दोघांच्या पारंपरिक पोशाखाने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे.

'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत अभिनेता विशाल निकम रायाची तर पूजा बिरारी मंजिरीची भूमिका साकारतेय. याशिवाय मालिकेत नीना कुळकर्णी, अतिशा नाईल, जय दुधाणे आणि संग्राम साळवी यांच्याही भूमिका आहेत.