
महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) आता लवकरच सासरेबुवा होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यांचा लेक सोहम बांदेकर अभिनेत्री पूजा बिरारीला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. आता पूजाच्या प्रतिक्रियाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

पूजाला नुकताच एका मुलाखतीमध्ये मालिकेतील राया खूपच तापट आहे, पण खऱ्या आयुष्यातील राया खूपच शांत आहे, त्याबद्दल काय सांगशील? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

प्रश्नाचे उत्तर देताना पूजा बिरारी खूप प्रचंड लाजली. काही क्षण तर ती फक्त हसतच होती. त्यानंतर हसत लाजतच तिने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले.

पूजाने सांगितले की, "नाही, मला यावर काही नाही म्हणायचे. इतक्यात तरी काही नाही म्हणायचे यावर."

गणपतीमध्ये पूजा बिरारी ही बांदेकरांच्या घरी गेली होती. तेथील आरतीच्या व्हिडीओमध्ये ती दिसत होती. त्यामुळे सोहम आणि पूजा लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.