
Post Office Monthly Income Scheme तुम्हाला फक्त एकदा पैसे जमा करायचे असतात. त्यानंतर दर महिन्याला तुम्हाला व्याजाच्या रुपात उत्पन्न मिळेल. ज्यांना नियमित मासिक उत्पन्न हवे आहे, त्यांच्यासाठी ही योजना आहे. सीनियर सिटीजन, रिटायर्ड व्यक्ती आणि गृहिणी.

या स्कीम अंतर्गत पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही ठेवलेल्या पैशाला भारत सरकारची हमी असते. याचा अर्थ ही गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. म्हणून तुम्ही लो-रिस्क आणि विश्वासर्ह उत्पन्नाची योजना शोधत असाल, तर हा पर्याय चांगला आहे.

पोस्ट ऑफिसात MIS मध्ये गुंतवणूकीची सुरुवात तुम्ही अवघ्या 1 हजार रुपयांपासून सुरु करु शकता. यामुळे प्रत्येक वर्गाचे लोक, खासकरुन मध्यमवर्गीय कुटुंब, सहज जोडले जाऊ शकतात. ही योजना छोट्या गुंतवणूकदारांसाठी सुद्धा सुरक्षित पर्याय आहे. ज्यांना स्थिर उत्पन्न हवं आहे.

या स्कीममध्ये तुम्ही दोन अकाऊंट ओपन करु शकता सिंगल आणि जॉइंट. एक व्यक्ती जास्तीत जास्त 9 लाखापर्यंत गुंतवणूक करु शकतो. जॉइंट अकाऊंट ओपन केल्यानंतर ही मर्यादा 15 लाखापर्यंत वाढते. जॉइंट अकाऊंटमुळे मासिक उत्पन्न सुद्धा वाढतं. कुटुंबासाठी ते फायद्याचं आहे.

MIS मध्ये वार्षिक व्याजदर 7.4 टक्के आहे. तुम्ही यात पाच लाख रुपयापर्यंत गुंतवणूक केली, तर दर महिन्याला सरासरी 3,083 रुपये इनकम मिळेल. 9 लाख रुपये गुंतवले तर ही रक्कम वाढून ₹5,550 रुपये होते. ही स्कीम त्या लोकांसाठी खरच चांगली आहे, ज्यांना नियमित उत्पन्न हवं आहे.