Expalined : मैत्री दाखवायला पण मोदी-पुतिन यांची सीक्रेट स्ट्रॅटेजी काय? रशियाला जे हव आहे, ती भारताची प्राथमिकताच नाही
Putin India Visit : युक्रेन युद्धानंतर पुतिन यांचा हा पहिला भारत दौरा आहे. हा दौरा म्हणजे भारत-रशिया संबंधांची अग्निपरीक्षा आहे. या दौऱ्याचे वेगवेगळे पैलू, प्राथमिकता, दृष्टीकोन आहे. रशियाला जे हवं आहे, ती सध्याच्या घडीला भारताची पहिली प्राथमिकता नाहीय. समजून घेऊया पुतिन यांच्या भारत भेटीमागचा उद्देश.

युक्रेन विरुद्ध युद्ध सुरु झाल्यानंतर व्लादिमीर पुतिन पहिल्यांदा भारत दौऱ्यावर आले आहेत. हा दौरा फक्त औपचारिक नाही, तर भारत-रशिया संबंधांची सर्वात मोठी परीक्षा मानला जात आहे. एकीकडे संरक्षण कराराचा दबाव, रशियाकडून रेकॉर्ड तेल आयात आणि अमेरिकेची नाराजी. भारताला प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलावं लागणार आहे. प्रश्न हा आहे की, भारत आणि रशियामध्ये आधी जितके घट्ट, दृढ संबंध होते, आजही दोन्ही देश तितकेच जवळ आहेत का? की बदलत्या जागतिक राजकारणात दोन्ही देश आपपाल्या रणनितीनुसार खेळत आहेत? पुतिन यांच्या भारत दौऱ्यामागचा खरा अर्थ समजून घेऊया.
अलीकडे वाणिज्य मंत्री पीयूष गोयल म्हणाले होते की, “आम्हाला रशियासोबत आर्थिक संतुलन हवं आहे. आम्ही रशियाकडून बरच काही खरेदी करतो, पण विकतो मात्र कमी. यात सुधारणा करणं ही आमची पहिली प्राथमिकता असेल” ‘आम्हाला भारताच्या चिंता कळतात. आम्हाला भारताकडून जास्त सामान खरेदी करायचं आहे” असं क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव स्वत: म्हणाले. हा योगायोग आहे का? आर्थिक आघाडीवर आम्ही एक आहोत हे दोन्ही देशांना जगाला दाखवायच आहे का?
भारताचा अजेंडा काय?
हे प्रश्न यासाठी निर्माण होत आहेत, कारण भारतीय अधिकारी संरक्षण विषयांना जास्त प्राधान्य देत नाहीयत. पेस्कोव यांनी जाहीरपणे सांगितलय की, SU-57 फायटर जेट आमच्या अजेंड्यामध्ये आहे. S-400 सिस्टिमबद्दल वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होईल. म्हणजे रशियासाठी संरक्षण करार महत्वाचे आहेत.
या भेटीमागाचा खरा उद्देश काय?
रशियाकडून मिळणारं स्वस्त तेल, S-400 आणि भविष्यात त्यापेक्षा अधिक अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टिम, अणवस्त्र पाणबुडी प्रोजेक्ट, फायटर जेट्सची खरेदी आणि टेक्नोलॉजी ट्रान्सफर यासाठी भारताला रशियाची गरज आहे. भारताला अमेरिका, युरोप आणि रशिया तिघांसोबत संतुलन ठेवायचं आहे. दुसरीकडे रशियाला मोठा विश्वासू बाजार, पाश्चिमात्य देशाचे प्रतिबंध असताना भारतासारख्या अर्थव्यवस्थेचे सहकार्य, शस्त्र आणि टेक्नोलॉजीच संयुक्त उत्पादनासाठी दीर्घकालीन भागीदारी. दोन्ही देशांमधील give and take हे पुतिन यांच्या दौऱ्यामागचं खरं कारण आहे.
या भेटीचा टायमिंग खूप महत्वाचा
भारत-रशिया संबंधांना विशेष रणनितीक भागीदारीचा दर्जा आहे. आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये 22 वार्षिक शिखर सम्मेलनं झाली आहेत. G20, BRICS, SCO आणि UN अनेक ठिकाणी दोन्ही देश एकत्र काम करतात. UNSC मध्ये भारताच्या कायमस्वरुपी सदस्यत्वाचा रशिया समर्थक आहे असं भारताचं म्हणणं आहे. पण युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदा भारत दौऱ्यावर येत आहेत. G20 परिषदेवेळी पुतिन भारतात आले नव्हते. म्हणून या भेटीचा टायमिंग खूप महत्वाचा आहे.
दोन्ही देशांना परस्परांची गरज का?
माजी परराष्ट्र सचिव शशांक यांच्यानुसार, युक्रेन युद्धामुळे रशिया दबावाखाली आहे. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफमुळे भारतावर देखील दबाव आहे. म्हणजे रशियाला पश्चिमेच्या आर्थिक प्रतिबंधांनी घेरलेलं आहे. भारताला अमेरिकेच्या टॅरिफचा फटका बसत आहे. दोन्ही देशांमधील संबंधात विश्वास जास्त महत्वाचा आहे. पण दोन्ही देशांना त्यांचे संबंध हाय-प्रोफाईल सुद्धा बनवायचे नाहीत. जेणेकरुन अमेरिका नाराज होऊ नये. म्हणून मोठ्या घोषणा कमी होतील. जुन्या करारांमध्ये अपडेट दाखवली जाईल. ही सायलंट डिप्लोमसीची रणनिती आहे.
