आंब्याच्या पेटीत असणारी पुडी नेमकी कशाची? त्यात असतं तरी काय?

आंब्याच्या पेटीत किंवा इतर फळांमध्ये दिसणाऱ्या या छोटाशा पुडीमध्ये नेमकं काय असतं, ही पुडी फळांमध्ये का ठेवली जाते, याचा तुम्ही कधी विचार केलाय का? तर या पुडीबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊयात..

| Updated on: Apr 17, 2025 | 12:22 PM
1 / 6
फळांचा राजा आंबा प्रत्येकालाच खूप आवडतो. उन्हाळ्यात आंबे कधी बाजारात येतायत आणि कधी त्यांचा आस्वाद घेतोय, याची प्रतीक्षा अनेकांना असते. आंब्यांच्या अनेक पेट्या या सिझनमध्ये विकल्या जातात. परंतु पेटी खरेदी करताना त्यात असणाऱ्या एका छोट्याशा पुडीकडे कधी तुमचं लक्ष वेधलं गेलंय का?

2 / 6
आंब्याच्या पेट्यांमध्ये दिसणारी ही छोटीशी पुडी खरंतर कॅल्शियम कार्बाइडची असते. या पुडीमध्ये कॅल्शियम कार्बाइड भरलेलं असतं, जे एक रसायन असून त्याचा उपयोग आंबे पिकवण्यासाठी केला जातो.

3 / 6
आंबे पिकवण्यासाठी केल्या जाणाऱ्या कॅल्शियम कार्बाइडच्या वापरावर खरंतर खाद्य आणि आरोग्य विभागाकडून प्रतिबंध लावण्यात आला आहे.

4 / 6
फक्त आंबेच नाही तर बाजारात मिळणाऱ्या कोणत्याही फळांना पिकवण्यासाठी या कॅल्शियम कार्बाइडच्या पुडीचा वापर केला जातो.

5 / 6
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) व्यापाऱ्यांना, फळ विक्रेत्यांना आणि खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांना इशारा दिला आहे की त्यांनी फळं पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर करू नये.

6 / 6
FSSAI ने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या खाद्य सुरक्षा विभागांना सांगितलं आहे की त्यांनी चुकीच्या पद्धती अवलंबणाऱ्यांवर कडक नजर ठेवावी आणि त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी.