
अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी' या चित्रपटात शरद केळकरनं एक छोटी भूमिका साकारली आहे.

या भूमिकेसाठी शरदवर चक्क कौतुकाचा वर्षाव होतोय. चाहत्यांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मीम्स तयार करण्यात आले आहेत. सोबतच चाहत्यांसाठी तो 4 नव्या चित्रपटाची मेजवानी देणार आहे.

भुज द प्राइड ऑफ इंडिया - या चित्रपटात अभिनेता अजय देवगन मुख्य भूमिका साकारणार आहे. अजय देवगनसोबत शरदही या चित्रपटात भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 1971 च्या भारत- पाकिस्तान युद्धावर आधारित आहे.

अवैध- या चित्रपटात शरद फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

जर्सी - शाहिद कपूरच्या आगामी 'जर्सी'मध्ये सुद्धा शरद केळकर झळकणार आहे. या चित्रपटात तो क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे.

अल्यान – शरद लवकरच तमिळ चित्रपटातही झळकणार आहे. त्यामुळे आता त्याच्या चाहत्यांची उत्सुक्ता शिगेला पोहचली आहे. महत्वाचं म्हणजे तो या चित्रपटात मूख्य भूमिकेत असणार आहे.