
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी ओळखली जाते. ती सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. नुकताच एका शोमध्ये प्राजक्ताने तिच्या पहिल्या शो विषयी सांगितले आहे.

प्राजक्ताने नुकताच 'MHJ Unplugged'मध्ये संवाद साधला. त्यावेळी तिने अनेक विषयांवर आपले मत मांडले. दरम्यान, तिने तिच्या पहिल्या TV शो विषयी सांगितले.

प्राजक्ता म्हणाली, बाबा संध्याकाळी घरी आल्यानंतर सर्वात पहिले टीव्ही बंद करायचे. मग बाहेर जाऊन बूट काढयचे आणि मग आत यायचे. माझ्या १०वी पर्यंत घरात केबल नव्हतं. त्यामुळे जेव्हा मी रिअॅलिटी शोमध्ये कास्ट झाले तेव्हा मला खरंतर शेजारच्यांच्या घरी जाऊन शो पाहावा लागला होता.

पुढे प्राजक्ता म्हणाली, मला रिअयल टेलिकास्ट पाहायला मिळाला नाही. कारण मी बाहेर होते. त्यामुळे मला रिपिट टेलिकास्ट पाहावा लागला होता. आधी अख्या दुनियेने पाहिला होता. मला शाळेत अनेकांनी कॉम्प्लिमेंट दिल्या होता. पण मला तो पाहायला मिळाला नाही.

प्राजक्ताचे वडील हे हवालदार होते. त्यामुळे ते अतिशय शिस्तप्रिय असल्याचे देखील प्राजक्ताने सांगितले. त्यांना सर्व गोष्टी अगदी वेगळच्या वेळी लागतात असे देखील प्राजक्ता माळी म्हणाली.