
‘टकाटक’ या चित्रपटाद्वारे मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री प्रणाली भालेराव सध्या पुन्हा चर्चेत आली आहे.

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या प्रणालीने खास आणि हटके फोटोशूट केलं आहे.

बोल्ड मेकअप आणि कंस्ट्रक्शन साईट हे अनोख समीकरण प्रणालीच्या या फोटोमध्ये पाहायला मिळतंय. प्रणालीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

‘टकाटक’ चित्रपटानंतर प्रणाली भालेराव ‘युवा डान्सिंग क्वीन’ या कार्यक्रमात झळकली होती.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून अभिनय विश्वात पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री प्रणाली भालेरावने मराठी मनोरंजन विश्वातही आपली खास जागा निर्माण केली आहे.

अभिनय जगतात पाऊल टाकण्यापूर्वीपासून प्रणाली मॉडेलिंग क्षेत्रात सक्रिय आहे. ती नेहमीच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

आता लवकरच प्रणाली ‘टकाटक 2’ या चित्रपटात झळकणार आहे.