
South Actor Biggest Records : भारतात बॉलिवूड आणि साऊथच्या इंडस्ट्रीने एकापेक्षा एक कलाकार दिलेत. अनेक कलाकारांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलय. अनेक रेकॉर्ड्स बनवलेत. असाच एक कलाकार आहे प्रेम नाजीर.

प्रेम नाजिरने साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये भरपूर काम केलय. त्याचं करिअर चार दशकांच होतं. पण या चार दशकाच्या दीर्घ करिअरमध्ये अभिनेत्याने इतकं काम केलं की, तुम्ही विचारही करु शकत नाही.

प्रेम नाजिर यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं. रिपोर्ट्सनुसार, त्याने 80 वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत काम केलं. यात सर्वाधिक चित्रपट अभिनेत्री शीलासोबत केले. शीला सोबत त्यांनी 130 चित्रपट केले. या रेकॉर्डसाठी त्यांच्या नावाची गिनीज बुकात नोंद झाली.

प्रेम नाजीरबद्दल असं म्हटलं जात की, त्याने एकावर्षात 30 चित्रपटांच शूटिंग केलं होतं. कुठलाही अभिनेता एका वर्षात 5-6 चित्रपटाचं शूटिंग करतो. पण प्रेम नाजीर अपवाद आहेत. प्रेम नाजीर यांनी एकदा नाही, तर दोन वेगवेगळ्या वर्षात 30 चित्रपट केले होते.

वयाच्या 62 व्या वर्षी प्रेम नाजीर यांचं निधन झालं. त्यांना अजून आयुष्य मिळालं असतं, तर त्यांच्या रेकॉर्ड्सची यादी वाढली असती. ते इतके वर्सेटाइल होते की, त्यांनी 40 चित्रपटात डबल रोल केलेला. हा एक असा रेकॉर्ड आहे, जो अजूनपर्यंत कुठलाही कलाकार मोडू शकलेला नाही.