
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसांचा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी राष्ट्रपती शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी पोहचल्या. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शिर्डी दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपतींच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत प्रचंड सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शिर्डीला छावणीचं स्वरुप आलं आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा साधेपणा शिर्डीकरांना दिसला. त्यांचा गाडीचा ताफ जात असताना अचानक त्या गाडीतून उतरल्या. रस्त्यावर उभ्या असेलेल्या साईभक्तांशी हस्तांदोलन करत त्यांची भेट घेतली.

हात जोडून त्यांनी भाविकांना नमस्कार केला. त्यांच्या साधेपणामुळे भाविक चांगलेच भारवले. त्यांच्याजवळ जाऊन फोटो काढण्सासाठी भाविकांची गर्दी केली.

राष्ट्रपती गाडीत खाली उतरत गर्दीत मिसळल्यामुळे सुरक्षा रक्षकांची धावपळ उडाली. विमानतळ ते शिर्डी मंदिराचा दहा ते बारा किलोमीटचा प्रवास राष्ट्रपतींनी कारने केला.