AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, म्हणाले, ‘एक एक करुन सगळे निघून…’

महानायक अमिताभ बच्चन यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन झाल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे... यावर बिग बींनी सोशल मीडियावर भावना देखील व्यक्त केल्या आहे... सध्या सर्वत्र अमिताभ बच्चन यांच्या पोस्टची चर्चा सुरु आहे.

अमिताभ बच्चन यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, म्हणाले, 'एक एक करुन सगळे निघून...'
अभिनेते अमिताभ बच्चन
| Updated on: Mar 13, 2026 | 8:34 AM
Share

महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर सध्या दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या जवळच्या मित्राला गमावलं आहे. ज्यामुळे त्यांना मोठं दुःख झाल आहे. बिग बींनी मित्राचं नाव आणि कशामुळे निधन झालं याबद्दल काहीही सांगितलं नाही. पण त्यांच्या पोस्टमधून स्पष्ट दिसून येत आहे की, त्यांनी आयुष्यातील एका खास व्यक्तीला गमावलं आहे… 83 वर्षीय अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगवर एका भावनिक पोस्टमध्ये मित्राच्या जुन्या आठवणी ताज्या केल्या. ज्यामध्ये त्याने प्रत्येक अडचण कशी सोपी केली आणि कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढला याचं वर्णन केलं आहे.

अमिताभ बच्चन यांनी 12 मार्च रोजी संध्याकाळी 3.50 वाजता त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलं… ‘आणखी एका प्रिय मित्राला गमावलं आहे… एक अशी व्यक्ती जो प्रंचड स्नेह आणि विनोदबुद्धीने संपन्न होता… कोणत्याही परिस्थितीत त्याने कधीच दुःख व्यक्त केलं नाही. फक्त परिस्थितीतून मार्ग काढत राहिला… त्याच्या चेहऱ्यावर फक्त आनंद दिसायचा… विश्वास होत नाही की, आता तो आमच्यात नाही… एक एक करून सगळे सोडून जात आहेत…’, या पोस्टसोबत अमिताभ बच्चन यांना रडणारा इमोजी पोस्ट केला… अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांना आधार दिला.

2025 मध्ये अमिताभ बच्चन यांनी गमावले अनेक मित्र

2025 मध्ये अमिताभ बच्चन यांनी अनेक मित्र गमावले. ज्यामध्ये दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आणि पियुष पांडे देखील आहे. धर्मेंद्र यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 24 नोव्हेंबर 2025 मध्ये धर्मेंद्र यांचं निधन झालं. धर्मेंद्र आजारीच होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलं होतं. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देखील देण्यात आला. पण घरी उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अमिताभ बच्चन यांच्या सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, नुकताच बिग बी सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत ‘वेट्टैयन’ सिनेमात दिसले होते. आता अमिकाभ बच्चन ‘कल्की 2898 एडी’ सिक्वल आणि ‘ब्रह्मस्त्र’ पार्ट 2 मध्ये दिसणार आहे… चाहते आजही अमिताभ बच्चन यांच्या सिनेमांच्या प्रतिक्षेत असतात. एवढंच नाही तर, चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी बिग बी कायम सोशल मीडियावर पोस्ट शेअर करतात.

Follow Us
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम