
राष्ट्रपतीपदाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी राजकीय घडामोडी मध्येही वाढ झालेली आहे. आज एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार आणि झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

आज संसद भवनात दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत पीएम मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे, विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा 27 जून रोजी उमेदवारी दाखल करण्याची शक्यता आहे.

राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी उमेदवारी दाखल करण्यापूर्वी संसदेत बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली.

राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी उमेदवारी दाखल करण्यापूर्वी संसदेत महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली

राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी उमेदवारी दाखल करण्यापूर्वी संसदेत डॉ बी आर आंबेडकर यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली.

एनडीएने आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिल्यानंतर या निवडणुकीला रंजक वळण आले आहे. त्याचवेळी झारखंडचे खासदार असलेले विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यामुळे झारखंड मुक्ती मोर्चासाठी संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. परिस्थितीत झारखंड मुक्ती मोर्चाने उद्या पक्षाच्या खासदार आणि आमदारांची बैठक बोलावली आहे. पक्षाचे सुप्रीमो शिबू सोरेन या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील.

मी अत्यंत भाग्यवान आहे की मला भारतातील आदिवासी समाजातील पहिल्या आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या नामनिर्देशनपत्रावर प्रथम समर्थक म्हणून स्वाक्षरी करण्याची संधी मिळाली. असे ट्विट मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले होते.