Priya Marathe : प्रिया मराठेची वर्षभरापूर्वी शेवटची पोस्ट; ‘या’ कारणामुळे मालिकेचाही घेतलेला निरोप

अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनाने मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देणाऱ्या प्रियाचं आज (रविवार) पहाटे चार वाजताच्या सुमारास निधन झालं. वर्षभरापूर्वी तिने सोशल मीडियावर शेवटची पोस्ट अपलोड केली होती.

| Updated on: Aug 31, 2025 | 10:50 AM
1 / 5
मराठी आणि हिंदी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचं कर्करोगाने निधन झालं. गेल्या दोन वर्षांपासून ती कर्करोगाशी झुंज देत होती. आज (रविवार) पहाटे चार वाजता मीरा रोड इथं तिने अखेरचा श्वास घेतला.

2 / 5
वयाच्या 38 व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला. 'तुझेच मी गीत गात आहे' या मराठी मालिकेत ती शेवटची झळकली होती. तिने आरोग्याच्या कारणास्तव या मालिकेला रामराम केला होता. त्यानंतर सोशल मीडियावरही ती सक्रिय नव्हती.

3 / 5
11 ऑगस्ट 2024 रोजी तिने इन्स्टाग्रामवर शेवटची पोस्ट अपलोड केली होती. पती शंतनू मोघेसोबतचे काही फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले होते. जयपूरमध्ये अमेर फोर्ट फिरतानाचे हे थ्रोबॅक फोटो होते. प्रियाला फिरायची प्रचंड आवड होती.

4 / 5
किल्ल्याची भव्यता आणि रचनेतील गुंतागुंत पाहून आम्ही थक्क झालो, असं कॅप्शन प्रियाने या फोटोंना दिला आहे. प्रियाच्या या शेवटच्या पोस्टवर चाहते कमेंट करत दु:ख व्यक्त करत आहेत. 'अजूनही विश्वास बसत नाहीये' अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

5 / 5
'या सुखांनो या' या मालिकेतून प्रियाने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती विविध मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये झळकली. 'पवित्र रिश्ता', 'बडे अच्छे लगते है' यांसारख्या हिंदी मालिकांमुळेही तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.