
महाराष्ट्राच्या लाडक्या गायिका म्हणजेच सावनी रविंद्र आणि प्रियंका बर्वे नेहमीच आपल्या सुमधूर गळ्यानं चाहत्यांची मनं जिंकतात.

आता परत एकदा प्रियंका आणि सावनीनं एक गाणं रेकॉर्ड केलं आहे.

‘कुसुंबी सावळे निळे उदे अनंत जांभळे…’ असं या गाण्याचं नाव आहे.

त्यामुळे आता त्यांच्या चाहत्यांना एका सुंदर गाण्याची मेजवानी मिळणार आहे.

या निमित्तानं आता या दोघींनी सुंदर फोटो शेअर केले आहेत.

महत्त्वाचं म्हणजे सावनी आणि प्रियंकानं हे गाणं सलील कुलकर्णी यांच्यासोबत रेकॉर्ड केलं आहे.प्रियंकानं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.