
प्रियांका चोप्रा हिने काही दिवसांपूर्वी बाॅलिवूडवर काही गंभीर आरोप केले होते. ज्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. आता प्रियांका चोप्रा हिच्याबद्दल अत्यंत मोठी बातमी पुढे येतंय.


जी ले जरा या चित्रपटात प्रियांका चोप्रा हिच्यासोबत आलिया भट्ट आणि कतरिना कैफ या देखील मुख्य भूमिकेत होत्या. या चित्रपटाची शूटिंग 2024 पासून सुरू केली जाणार आहे.

हाॅलिवूड चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने प्रियांका चोप्रा हिच्याकडे जी ले जरा चित्रपटासाठी वेळ नसल्याचे सांगितले जात आहे. रिपोर्टनुसार प्रियांकाने या चित्रपटाला नकार दिलाय.

आता प्रियांका चोप्राच्या जागी निर्माते नव्या अभिनेत्रीचा शोध घेत आहेत. एक चर्चा अशी देखील आहे की, बाॅलिवूडवर आरोप केल्यानेच प्रियांकाकडून हा चित्रपट काढून घेण्यात आलाय.