20 मिनिटे शरद पवार यांच्या नातीच्या रिसेप्शनमध्ये मोदी, अमित शाह आणि राहुल गांधी एकदाच दाखल, पाहा सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या रिसेप्शनचे फोटो..
सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती आणि सारंग यांचे रिसेप्शन दिल्लीत पार पडले. या रिसेप्शनला मोठ्या राजकीय लोकांनी हजेरी लावली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 मिनिटे तिथे होते. यावेळी पवार कुटुंबासोबत गप्पा मारताना नरेंद्र मोदी दिसले.

सकाळी शरद पवार यांच्या गटाच्या 8 खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर विविध चर्चांना उधाण आले. यादरम्यानच रात्री दिल्लीत सुपिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि सारंग लखाणी यांचे रिसेप्शन पार पडले.

या रिसेप्शनला राजकीय नेत्यांची मांदियाळी बघायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांनी हजेरी लावली. राहुल गांधी आणि अमित शाह एकाच वेळी रिसेप्शनमध्ये दाखल झाले.

अमित शाह ज्यावेळी मंचावर आले, त्यावेळी राहुल गांधी आणि सोनिया गांधी मंचाच्या खालीच होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 मिनिटे या कार्यक्रमात उपस्थित होते. शरद पवार आणि मोदी एकमेकांच्या बाजूला बसले होते. दोघांमध्ये काहीवेळ गप्पाही झाल्या.

सुप्रिया सुळे यांच्या पूर्ण कुटुंबासोबत फोटो काढताना पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसले.अमित शाह आणि शदर पवार गप्पा मारताना यादरम्यान दिसले.पवारांच्या शेजारी जाऊन अमित शाह बसले.

यासोबतच सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या रिसेप्शनला बड्या राजकीय नेत्यांनी हजेरी लावली.मुंबईमध्ये सुप्रिया सळे यांच्या लेकीचे लग्न पार पडले.त्यानंतर दिल्लीत आता रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले.