पावसाळ्यात सांपापासून घराचे संरक्षण करायचे तर या 5 वनस्पती लावा, निर्धास्त राहा

पावसाचे दिवस सुरु आहेत. पावसाळ्यात अनेकदा सरपटणारे जीव आणि किडे घरात येण्याचा धोका असतो. खास करुन तुमचे घर जर बैठे असेल तर सांप देखील घरात येऊ शकतात. नदी किंवा तलावाच्या आसपास जर तुमचे घर असेल तर सांपाचाही धोका असतो. शिवाय सांपाचे भक्ष्य असलेले बेडूक पावसाळ्याच्या सुमारास घरात येतात. आणि या भक्ष्याच्या शोधात सर्प देखील घरात येऊ शकतात. त्यामुळे या सापांना रोखण्यासाठी काही वनस्पती महत्वाच्या ठरू शकतात. यांना घराभोवती लावल्यास घराच्या आजूबाजूलाही साप भटकणार नाहीत.

| Updated on: Jun 22, 2025 | 7:28 AM
1 / 5
सर्पगंधा - सर्पगंधा ही वनस्पती नावाप्रमाणे तीव्र गंध येणारी वनस्पती आहे. तिचा विचित्र आणि वेगळा वास सापांना अजिबात आवडत नाही. त्यामुळे घराच्या भोवती अशी वनस्पती लावली की सांप आजूबाजूला येतच नाही.

2 / 5
नागदौना - या वनस्पतीला नागदोन किंवा 'नागदमनी' वा 'विषमार' असेही म्हटले जाते. या वनस्पतीचा तीव्र सुगंध सापांना आवडत नाही. मान्सूनमध्ये घराच्या अंगणात ही वनस्पती लावली तर साप आजूबाजूला भटकत नाहीत.

3 / 5
 झेंडू - झेंडूंच्या फुलांना तीव्र सुंगध असतो. हा गंध सापांना आवडत नाही. ही केशरी किंवा धम्मक पिवळ्या रंगांची फुले घराची आणि बागेची शोभा तर वाढवताच शिवाय सापांनाही दूर ठेवतात. त्यामुळे घरांचे या सरपटणाऱ्या प्राण्यापासून संरक्षण होते आणि घर सुंदरही दिसते.

4 / 5
निवडुंग - काटेरी निवडूंगाचे अनेक प्रकार असतात. या निवडूंगाची काही शोभिवंत रोपटी आता घरांची शोभा वाढवतात. परंतू जंगली निवडुंग नेहमीच सापांपासून रक्षण करते. कुंपण म्हणून काटेरी निवडूंग घराच्या भोवती लावल्यास सापांना घरात प्रवेश करता येत नाही. साप नेहमीच काट्यापासून दूर राहतात.

5 / 5
स्नेक प्लांट -  स्नेक प्लांटची टोकेरी आणि लांब पाने सापांना आवडत नाहीत.या रोपट्यांना  “मदर-इन-लॉज टंग” देखील म्हटले जाते. हे रोपटे घराच्या डेकोरेशनसाठी देखील खूपच सुंदर दिसते. तसेच ते नैसर्गिक सुरक्षाकवच म्हणून देखील उपयोगी असल्याने कुंपण म्हणून घराभोवती लावण्याची शिफारस केली जाते. त्यामुळे साप या झाडांच्या आजूबाजूला फिरकत नाहीत असे म्हटले जाते