
पुण्यातील ऑटो पर्ट्सची निर्मिती करणारी बेलाराईज इंडस्ट्रीज ही कंपनी आपला आयपीओ घेऊन येणार आहे. हा बहुप्रतिक्षीत आयपीओ येत्या 21 मे 2025 रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून एकूण 2150 कोटी रुपये उभे कणार आहे.


विशेष म्हणजे या आयपीओत सर्व फ्रेश शेअर्स असतील. यातील एकही शेअर ऑफर फॉर सेल नसेल. या आयपीओत गुंतवणूक करायची असेल तर कमीत कमी 166 शेअर्स घ्यावे लागतील.

ipo

या आयपीओत तुम्हाला शेअर्स मिळाले तर 26 मे पर्यंत तुमच्या खात्यावर ते जमा होतील. तसेच ही कंपनी 28 मे पर्यंत बीएसई आणि एनएसईवर सूचिबद्ध होईल.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)