
पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यात पावसाचा जोर काहीसा वाढल्यानंतर पर्यटन स्थळांवर पर्यटक करू लागले गर्दी, पर्यटन स्थळ गर्दीने फुलली आहे. रविवारच्या सुट्टीच औचित्य साधून भोर तालुक्यातील पर्यटन स्थळंवर पर्यटकांची गर्दी झाली आहे.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या १६ व्या वर्षी रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताभिषेक करून आपल्या सवंगडयांच्या साथीने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. हा किल्ला भोर तालुक्यात आहे.

भोर तालुक्याती भाटघर धरणाचा परिसरसुद्धा निसर्गरम्य आहे. भाटघर धरण हे ब्रिटीशांना बांधले होते. शेतीला पाणीपुरवठा करण्यासोबत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी हे धरण बांधले गेले होते.

रिमझिम पावसात हिरवाईने नटलेल्या निसर्गरम्य परिसराचा पर्यटक आनंद घेत आहेत. निसर्गाच हे रूप आपल्या मोबाईल कॅमेरात कैद करत आहेत. पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळत आहे.

पुणे जिल्ह्यात अनेक निसर्गरम्य पर्यटनस्थळे आहेत. त्यात लोणावळा, खंडाळा जाण्याकडे पर्यटकांचा ओघ असतो. परंतु शांत अन् निसर्गाने भरभरुन दान दिलेल्या भोरकडे पर्यटक आता मोठ्या संख्येने वळू लागले आहे.