सिलेंडरसाठी रांगा… महाराष्ट्रात कुठेकुठे जनता तासोंतास उन्हात उभी?

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याचे पडसाद आता भारतातील उद्योग-व्यवसायांवर उमटू लागले आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सिलेंडरसाठी जनता तासोंतास रांगेत उभी आहे. अनेक ठिकाणी तर, पोलीस बंदोबस्तदेखील आहे. तर फोटोंमध्ये पाहा महाराष्ट्रात कुठेकुठे जनता तासोंतास उन्हात उभी आहे?

| Updated on: Mar 12, 2026 | 2:05 PM
1 / 6
मालेगाव : मालेगावात दुसऱ्या दिवशीही गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. सिलेंडर घेण्यासाठी मालेगावात सकाळपासूनच रांगा लागल्या आहेत. गॅस भेटणार नाही या भीतीने लोकांची झुंबड झाली आहे. महसूल प्रशासन गॅस वितरण व्यवस्थेकडे लक्ष ठेवून आहेत.  सर्वांना घरगुती गॅस मिळेल लोकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन महसूल प्रशासनाने केलं आहे.

2 / 6
नागपूर : नागपुरात घरगुती गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांग लागली आहे. प्रशासनाकडून तुटवाढ नसल्याचं सांगितलं जातं असलं तरी लांब रांगा लागल्या आहेत. सिलेंडर गोडाऊन मधून मिळत असून सुद्धा नागरिकांची भर उन्हात गर्दी वाढली आहे. काही वेळा पूर्वीच सिलेंडरची गाडी आली असल्याने सिलेंडर मिळत आहेत. मात्र सिलेंडर तुटवडा निर्माण होईल या भीतीने नागरिक गर्दी करत आहे, सिलेंडरचा तुटवडा नाही पण सिस्टम मध्ये काही अडचणी असल्याने पॅनिक होत असल्याचं एजन्सी चालकांचे म्हणणे

3 / 6
भंडारा :   भंडारा जिल्ह्यातील तांदूळ निर्यातीवर त्याचा थेट परिणाम झाला असून अनेक राईस मिल चालक अडचणीत सापडले आहेत. आखाती देशांमध्ये तांदळाची निर्यात मोठ्या प्रमाणावर होत असते; मात्र सध्याच्या अस्थिर परिस्थितीमुळे निर्यात प्रक्रिया जवळपास ठप्प झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील अनेक राईस मिलमध्ये उत्पादन कमी करण्यात आले आहे. काही ठिकाणी कामगारांची कपातही करण्यात आली असून अनेक कामगारांसमोर पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

4 / 6
सातारा:  सातारा जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने घरगुती सिलेंडरचा मुबलकसाठा असल्याचे जाहीर करून देखील गॅस एजन्सीच्या बाहेर सिलेंडर खरेदीसाठी ग्राहकांच्या भल्या मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात असणाऱ्या इंडेन गॅस एजन्सीच्या बाहेर आज सकाळपासूनच नागरिकांची भली मोठी रांग लागलेली पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात पुढील दहा ते बारा दिवस पुरेल इतका साठा उपलब्ध असून रोज 22000 सिलेंडर जिल्ह्यात वितरित केले जात आहेत.. मात्र युद्धजन्य परिस्थितीच्या भीतीने नागरिक भर उन्हात सिलेंडर घेण्यासाठी गर्दी करताना पाहायला मिळत आहे.

5 / 6
नागपूर: नागपूरातील ताजबाग परिसरात गॅस सिलिंडर घेण्यासाठी ग्राहकांचा गर्दी मोठी गर्दी जमली आहे. एचपीच्या गॅस गोडाऊनबाहेर ग्राहकांची गर्दी जमली आहे. लोक रिकामे सिलिंडर घेऊन रांगेत उभे आहेत. वेळेवर गॅस सिलिंडर मिळत नसल्याचा ग्राहकांचा आरोप आहे.

6 / 6
कोल्हापूर: कोल्हापूर शहरात सलग तिसऱ्या दिवशी गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण करण्याची वितरकांवर वेळ आली आहे. गॅस वितरण करताना होणाऱ्या वादावादीमुळे पोलीस बंदोबस्तात आहे कोल्हापूरच्या संभाजीनगर मधील संदीप गॅस एजन्सीमध्ये ग्राहकांनी गर्दी केल्याने पोलीस बंदोबस्त करण्यात आला..

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us