Rahul Vaidya: राहुल वैद्यचं मुंबईत आलिशान घर; पत्नी अन् लेकीच्या फोटोंनी सजवला कोट्यवधींचा आशियाना

Rahul Vaidya: मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या राहुलने संगीताच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण केली आणि आता मुंबईत स्वतःचं स्वप्नवत घर उभारलं आहे.

| Updated on: Sep 15, 2026 | 2:03 PM
1 / 7
‘इंडियन आयडल’च्या पहिल्या सिझनमधून घराघरात पोहोचलेला गायक राहुल वैद्य सध्या त्याच्या नव्या आलिशान घरामुळे चर्चेत आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात राहुलने एक सुंदर आणि प्रशस्त घर घेतलं असून, त्याच्या या घराची झलक नुकतीच समोर आली आहे.

‘इंडियन आयडल’च्या पहिल्या सिझनमधून घराघरात पोहोचलेला गायक राहुल वैद्य सध्या त्याच्या नव्या आलिशान घरामुळे चर्चेत आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात राहुलने एक सुंदर आणि प्रशस्त घर घेतलं असून, त्याच्या या घराची झलक नुकतीच समोर आली आहे.

2 / 7

प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खान राहुलच्या घरी पोहोचली होती. तिच्या कुकिंग व्लॉगमधून राहुलच्या या घरातील अनेक गोष्टी चाहत्यांना पाहायला मिळाल्या. राहुल वैद्यचं हे घर केवळ आलिशानच नाही, तर त्याच्या कुटुंबाशी आणि वैयक्तिक आयुष्याशी जोडलेल्या आठवणींनीही सजलेलं आहे.

3 / 7

घराच्या भिंतींवर आई-वडील, पत्नी दिशा परमार, मुलगी आणि कुटुंबासोबतचे फोटो लावण्यात आले आहेत. त्यामुळे घराला महागड्या इंटेरिअरसोबतच एक भावनिक स्पर्शही मिळाला आहे. राहुलच्या घरातील लिव्हिंग एरिया विशेष लक्षवेधी आहे. संपूर्ण जागेची थीम क्रीम रंगात ठेवण्यात आली आहे.

4 / 7

त्याला साजेसे सोफा आणि फर्निचर वापरून घराला एलिगंट लूक देण्यात आला आहे. मोठ्या स्क्रीनचा टीव्हीही लिव्हिंग रूममध्ये आहे, जिथे राहुल आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतो. घराच्या इंटिरियरमध्ये आधुनिकतेसोबतच लाकूड आणि मार्बलच्या घटकांचा वापर करण्यात आला आहे.

5 / 7

राहुलच्या घराची आणखी एक खासियत म्हणजे त्याची बाल्कनी. या बाल्कनीतून मुंबईचा दूरपर्यंत पसरलेला नजारा दिसतो. फराह खाननेही या दृश्याचं कौतुक केलं. बाल्कनीमध्ये एक सुंदर झुलाही ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ही जागा आराम करण्यासाठी आणि कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी खास बनली आहे.

6 / 7

राहुल आणि त्याची पत्नी दिशा परमार यांनी वांद्यातील या आलिशान घरात नुकताच प्रवेश केला असून, या घराची किंमत सुमारे नऊ कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. समुद्राच्या दिशेने असलेली दृश्यं आणि आलिशान सुविधा या घराला आणखी खास बनवतात.

7 / 7

राहुलच्या घरातील सर्वात सुंदर भागांपैकी एक म्हणजे त्याने तयार केलेलं छोटंसं मंदिर. घरातील भिंतींवर आकर्षक पेंटिंग्स लावण्यात आली आहेत. ‘इंडियन आयडल’मधील संघर्षापासून आजच्या आलिशान आयुष्यापर्यंतचा राहुलचा प्रवास प्रेरणादायी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us