
इर्शाळवाडीवर डोंगराचा कडा कोसळला त्यामुळे खाली असलेली घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडली गेलीत.

ही दुर्देवी घटना रात्री 11 वाजता घडली त्यानंतर आजूबाजूच्या वाडीतील लोक जमा झाले आणि प्रशासनाला याची माहिती दिली.

इर्शाळवाडीमधील ढिगाऱ्याखाली सापडलेल्याा मृतांना आणि जखमींना मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 लाखांची मदत जाहीर केली.

सकाळी 6.20 पासून NDRF टीमकडून बचावकार्य सुरू करण्यात आलं. या वाडीपर्यंत जाण्यासाठी 1.5 किमी पायी चालत जावं लागतं.

अनेक घर मोडली गेली आहेत मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान झालं आहे. डोंगराच्या जवळची घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडली आहेत.

आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून 21 जणांचा वाचवण्यात यश आलं आहे. आता हे बचावकार्य थांबवण्यात आलं असून उद्या म्हणजेच सकाळी शुक्रवारी सकाळी पाच वाजता हे बचावकार्य सुरू करण्यात येणार आहे.