मराठमोळ्या अभिनेत्रीने दाखवले ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीचे व्रण; म्हणाली ‘शरीरावरील या खुणा..’

अभिनेत्री राजश्री देशपांडेनं तिच्या ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीच्या खुणा दाखवल्या आहेत. इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. माझ्या जखमा माझ्या जगण्याची कहाणी सांगतात, असं तिने म्हटलंय.

| Updated on: May 01, 2026 | 3:34 PM
1 / 5
‘सेक्रेड गेम्स’ या गाजलेल्या वेब सीरिजमधअये नवाजुद्दीन सिद्दिकीच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारलेली मराठमोळी अभिनेत्री राजश्री देशपांडेला कॅन्सरचं निदान झालं होतं. सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने याबद्दलची माहिती दिली होती. आता राजश्रीने तिच्या सर्जरीच्या खुणा दाखवल्या आहेत.

2 / 5
राजश्री रुटीन चेकअपसाठी गेली असता तिला ग्रेड 1 ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यासाठी तिने उपचार घेतले असून तिच्यावर सर्जरीसुद्धा करण्यात आली होती. इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत राजश्रीने सर्जरीच्या खुणा दाखवल्या आहेत. त्याचसोबत तिने तिच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.

3 / 5
माझ्या जखमा माझ्या जगण्याची कहाणी सांगतात. प्रत्येक खुण मला या गोष्टीची आठवण करून देते की मी लढले, मी जगले आणि मी जिंकले. ब्रेस्ट कॅन्सरने माझ्या शरीरावर खूण सोडली, पण माझ्या ऊर्जेला ती स्पर्श करू शकली नाही, अशी पोस्ट राजश्रीने लिहिली आहे.

4 / 5
यामध्ये तिने पुढे लिहिलं, 'ज्या प्रत्येक स्त्रीने आपला प्रकाश मंद होऊ दिला आहे, तिने कृपया आता उठून उभं राहावं. तुम्ही खूप सुंदर आहात आणि तुमच्या शरीरावरील व्रण हे काही डाग नाहीत, ते तुमच्या धैर्याचं मुकूट आहेत.' या पोस्टद्वारे राजश्रीने कॅन्सरशी लढा देणाऱ्या प्रत्येक महिलेला प्रेरणा दिली आहे.

5 / 5
राजश्री अभिनयासोबतच तिच्या सामाजिक कार्यासाठीही ओळखली जाते. 2026 मध्ये बरीच सामाजिक कामं मार्गी लावण्याचा तिचा प्लॅन होता, आणि ठरल्याप्रमाणे ते पूर्ण करणार असल्याचा मानस तिने व्यक्त केला आहे. या धाडसी प्रवासात मी विश्वास, धैर्य आणि प्रेमाने भरलेल्या हृदयाने पाऊल ठेवत आहे, असं तिने म्हटलं.

Follow Us