
नेहमीच अनोख्या आणि हटके शैलीत दिसणाऱ्या राखीनं चक्क पीपीई किट परिधान केलेला दिसला. कोरोनानं परत डोकं वर काढलं आहे, त्यामुळे प्रत्येकाला आपला जीव वाचवायचा आहे. अशा परिस्थितीत राखीनं सांगितलं की तिने काही पीपीई किट लोकांनासुद्धा दिल्या आहेत.

PPE किट परिधान केलेल्या अवतारात राखी प्रचंड क्यूट दिसत होती.

तर मीडियासोबत बोलताना ती म्हणाली की सध्याची परिस्थिती बघता आता तिला असंच घराबाहेर पडावं लागेल.

मात्र राखीला या अंदाजात बघून तिच्या चाहत्यांना शॉकच बसला.

मात्र कोरोना परिस्थिती बघता आपल्याला असं करावं लागणार असल्याचं ती म्हणाली.

तर आपण काही किट्सचं गरजू लोकांना वाटप केल्याचंही राखीनं सांगितलं.