
राम मंदिराची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर राम मंदिराच्या थीमवर आधारित एक नेकलेसही चर्चेत आहे. हिरे आणि चांदीने बनवलेल्या नेकलेसवरून नजर हटत नाही.

22 जानेवारी 2024 या दिवशी अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होईल. संपूर्ण देशाचे या सोहळ्याकडे लक्ष लागले आहे. यासाठी एका भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तयारीही जोरात सुरू आहे.

याचनिमित्ताने गुजरातच्या हिरे व्यापाऱ्याने एक सुंदर नेकलेस बनवला आहे. मात्र तो कोणत्याही व्यावसायिक उद्देषाने बनवला नसून, तो नेकलेस भेट म्हणून देण्यात येईल.

राम मंदिराच्या थीमवर आधारित या नेकलेसमध्ये श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांची मूर्ती आहे. तसेच श्री हनुमान यांचीही मूर्ती त्यामध्ये आहे. अतिशय सुंदर अशा या नेकलेसवरून डोळे हटत नाहीत.

विशेष म्हणजे हा नेकलेस बनवण्यासाठी तब्बल 5 हजार हिऱ्यांचा वापर करण्यात आला असून हा हार 2 किलो चांदीने बनला आहे.

राम मंदिर थीमवर आधारित हा नेकलेस घडवण्यासाठी 40 कारागिरांनी 35 दिवस अथक मेहनत केली. तो अतिशय सुंदर बनला आहे.