
शाबान महिन्यानंतर रमजान सुरू होतो. यावेळी शाबान महिना 9 मार्च किंवा 10 मार्च रोजी संपत आहे. सौदी अरेबियात रमजानचा चंद्र दिसताच दुसऱ्या दिवशी भारतात पहिला रोजा पाळला जातो. या महिन्यात कोणत्या शहरात महाराष्ट्रातील विविध शहरातील सेहरी आणि इफ्तारचे वेळापत्रक.

चंद्राच्या दर्शनावर रमजान अवलंबून असतो. चंद्रकोर पाहण्याला इस्लाममध्ये धार्मिक महत्त्व आहे. पवित्र महिना अधिकृतपणे या निरीक्षणाने सुरू होतो आणि समाप्त होतो. ज्या दिवशी समाप्त होतो, त्या दिवशी ईद साजरी केली जाते.

रमजान महिनाभर असतो. परंतु त्या महिन्यात किती दिवस असतील हे चंद्रावर अवलंबून असते. मार्च महिन्यात सुरु झालेला रमजान महिना एप्रिलमध्ये संपणार आहे. 9 किंवा 10 एप्रिल 2024 रोजी रमजान संपणार आहे. त्या दिवशी ईद साजरी होईल.

इस्लाम धर्मात रमजान महिन्यात उपवास ठेवले जातात. उपवासाच्या वेळी सेहरी म्हणजे सूर्योदयापूर्वी केली जाते. त्यानंतर दिवसभर काहीच खात पित नाही. त्यानंतर संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्तानंतर इफ्तारच्या वेळी उपवास सोडला जातो.

रमजान महिन्याचा उपवास करणाऱ्यांना रोज पाच वेळा नमाज अदा करणे बंधनकारक आहे. या काळात गरीब आणि गरजूंना जकात (मदत) केली जाते. रमजानच्या शेवटच्या दिवशी चंद्र दिसल्यानंतर ईद-उल-फित्र हा सण साजरा केला जातो.

रमजानमधील उपवास तीन अशरमध्ये विभागले गेले आहेत. त्यात पहिले 10 दिवस दया, दुसऱ्या 10 दिवसांना आशीर्वाद तर शेवटच्या 10 दिवसांना क्षमा म्हणतात.मुस्लिम धर्मात सर्वांना रमजानमध्ये उपवास करणे अनिवार्य आहे. तथापि, लहान मुले आणि शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्यांना यामध्ये सूट दिली आहे.