AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! बलाढ्य देशाचा इराणला पाठिंबा, अमेरिका-इस्रायलसह संपूर्ण जगात खळबळ

Iran vs USA : इराण आणि इस्रायल अमेरिकेत सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगात तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. अशातच आता एका देशाने इराणला उघड पाठिंबा दिला आहे.

मोठी बातमी! बलाढ्य देशाचा इराणला पाठिंबा, अमेरिका-इस्रायलसह संपूर्ण जगात खळबळ
Iran TurkiyeImage Credit source: Google
| Updated on: Mar 11, 2026 | 8:11 PM
Share

इराण आणि इस्रायल अमेरिकेत सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगात तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर भीषण हल्ले होत आहेत. अशातच आता तुर्किये या देशाने इराणला जाहीर पाठिंबा दिला आहे. अंकारा येथे सत्ताधारी पक्षांच्या खासदारांशी बोलताना राष्ट्रपती रेसेप तय्यिप एर्दोगानयांनी म्हटले, ‘मी सुन्नीही नाही आणि शिया देखील नाही. आपण सर्वजण मुसलमान आहोत. हा पाठिंबा देण्याचा काळ आहे. हा युद्ध थांबवण्याचा काळ आहे. जर असे झाले नाही तर संपूर्ण जग पेटून उठेल.’

तुर्कियेने इराणला पाठिंबा देताना सर्व मुस्लिमांनी इराणला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. एर्दोआन यांनी पुढे सांगितले की, ‘संकटाच्या वेळी मी पाठ फिरवणाऱ्यांपैकी नाही. मी बोलणार आणि युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करणार.’ डेली साहेब या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, एर्दोआन यांनी खासदारांना सांगितले की या युद्धाची सुरुवात इस्रायलमुळे झाली आहे आणि तेच ते थांबवू शकतात. जर अमेरिकेने कूटनीतीला प्राधान्य दिले, तर युद्ध थांबू शकते. या प्रक्रियेत तुर्की सक्रिय भूमिका बजावू शकते.’

इस्रायलच्या रडारवर तुर्की

दरम्यान, इस्रायलच्या रडारवर तुर्की देखील आहे. बुधवारी (11 मार्च) इस्रायलचे माजी पंतप्रधान बेनेट यांनी म्हटले कीस ‘तुर्कीही इराणच्या मार्गावर चालत आहे. तिथे सुन्नी मुस्लिमांचा एक गट तयार केला जात आहे, ज्यामध्ये हमास, कतार आणि सिरीया यांचा समावेश आहे. या गटांचा उद्देश इस्रायलला नुकसान पोहोचवणे आहे. हे देखील महत्त्वाचे आहे की तुर्की हा एकमेव देश आहे ज्यावर इराणने आक्रमक पद्धतीने हल्ला केलेला नाही.

इराण-अमेरिकेत मध्यस्थीचा प्रयत्न

तुर्किये अजूनही इराण आणि अमेरिका यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी स्वतः राष्ट्रपती एर्दोआन सक्रिय झाले आहेत. तुर्कीतील बैठकीत खासदारांना गुप्त माहिती (सीक्रेट ब्रीफिंग) देण्यात आली आहे. हकान फिदान (तुर्कीचे परराष्ट्र मंत्री) आणि आणखी एका मंत्र्याने सुमारे 30-30 मिनिटे खासदारांसमोर माहिती सादर केली. या संकटाचा सामना कसा करायचा याबद्दल ही माहिती होती.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.