AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 स्पर्धेत 20 सामन्यांचा थरार! मुंबई इंडियन्सचे पहिल्या टप्प्यात इतके सामने

आयपीएल 2026 स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. पहिल्या टप्प्यात 20 सामन्यांची घोषणा केली. यात मुंबई इंडियन्सचे पहिल्या टप्यात चार सामने होणार आहेत. ही स्पर्धा 28 मार्चपासून सुरू होणार आहे.

IPL 2026 स्पर्धेत 20 सामन्यांचा थरार! मुंबई इंडियन्सचे पहिल्या टप्प्यात इतके सामने
IPL 2026 स्पर्धेत 20 सामन्यांचा थरार! मुंबई इंडियन्सचे पहिल्या टप्प्यात इतके सामनेImage Credit source: Mumbai Indians Twitter
| Updated on: Mar 11, 2026 | 8:34 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेचं बिगुल वाजलं असून ठरल्याप्रमाणे ही स्पर्धा 28 मार्चपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या टप्प्यात 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यातील निवडणुका जाहीर केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल. 28 मार्च ते 12 एप्रिल दरम्यानच्या 20 सामन्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. तसेच नाणेफेकीचा कौल संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या टप्प्यात मुंबई इंडियन्सचे चार सामने होणार आहे.

मुंबई इंडियन्सचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स संघासोबत होणार आहे. हा सामना 29 मार्चला होणार आहे. या सामन्याचं ठिकाण काही ठरलेलं नाही. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. हा सामना 4 एप्रिल रोजी होईल. मुंबई इंडियन्सचा तिसरा सामना 7 एप्रिलला संध्याकाळी 7.30 वाजत राजस्थान रॉयल्सशी होईल. तर 12 एप्रिलला रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने येतील.

या स्पर्धेत एकूण 74 सामने होणार की 84 हे देखील स्पष्ट नाही. यंदा सामन्यांची वाढवणार अशी चर्चा रंगली आहे. जर 10 सामने वाढले तर प्रत्येक संघाला 16 सामने खेळावे लागू शकतात. आयपीएल मिडिया हक्क करारानुसार, बीसीसीआयने 18व्या आणि 19व्या पर्वात 84 सामने होतील असं ठरवलं होतं. पण मागच्या पर्वात 74 सामने झाले होते. त्यामुळे यंदा काय निर्णय घेतात? याकडे लक्ष असेल.

मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ : रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, रायन रिकल्टन, तिलक वर्मा, रॉबिन मिन्ज, मिचेल सैंटनर, नमन धीर, विल जॅक्स, कॉर्बिन बॉश, राजअंगद बावा, ट्रेंट बोल्ट, दीपक चाहर, अल्लाह गजनफर, शार्दुल ठाकुर, शरफेन रदरफोर्ड, मयंक मार्कंडे, क्विंटन डिकॉक, दानिश मालेवर, अथर्व अंकोलेकर, मोहम्मद इजहार, मयंक रावत.

Follow Us
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली