रणबीर-आलियाच्या लेकीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, अवघ्या 4 वर्षात राहा दिसणार ‘या’ सिनेमात
Raha Kapoor Movie: अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांची चार वर्षांची लेक राहा लवकरच चित्रपटात झळकणार आहे.

अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेचा रणबीर कपूर यांची लेक राहा कपूरचीही अवघ्या चार वर्षात बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली आहे. अवघ्या चार वर्षांची राहा सिनेमात झळकणार असल्याचे रणबीर कपूरने बोलून दाखवले आहे.
आता आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राहाने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. इतक्या कमी वयातच तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आहे. या संदर्भातील माहिती खुद्द रणबीर कपूरने बीबीसी न्यूज इंडियाला दिली आहे.
या मुलाखतीत रणबीर कपूर म्हणाला की, "मी आणि आलिया राहाला अनेकदा रामायणातील कथा सांगत असतो, यामुळे राहा लहानपणापासूनच या महाकाव्याने मोहित झाली आहे. "
राहाने अनेकदा रामायणाच्या सेटला भेट दिली आहे. यावेळी तिने साई पल्लवी आणि लक्ष्मणची भूमिका साकारणाऱ्या रवी दुबे यांच्यासोबत एक शॉटही केला आहे." असं रणबीर म्हणाला.
"यावरुन रणबीरच्या मते राहा या चित्रपटाचा एक भाग राहिली असल्याचे समजत आहे. मोठ्या पडद्यावर राहाला सर्वात आधी स्वत:ला पाहता येणार आहे." याचा मला आनंद आहे,. असं रणबीर म्हणाला.