
पुणे शहरात वास्तव करण्यास अनेक जण प्राधान्य देतात. मराठी चित्रपटातील अनेक स्टार पुण्यात राहतात. परंतु हिंदी चित्रपटातील बॉलीवूड स्टार रणबीर कपूर पुणे याने पुणे शहरात राहण्यासाठी फ्लॅट भाड्याने घेतला आहे. पुण्यातील अलिशान असलेल्या ट्रम्प टॉवरमध्ये फ्लॅट रणबीर याने घेतला आहे.

रणबीर कपूर याने घेतलेल्या फ्लॅटची चर्चा पुण्यात आहे. पुणे येथील ट्रम्प टॉवर ही देशातील सर्वात महाग बिल्डींग आहे. अमेरिकेसह जगातील अनेक देशात या पद्धतीचे टॉवर आहेत. पुण्यातील या टॉवरमध्ये अनेक चर्चित व्यक्ती राहतात.

पुणे येथील ट्रम्प टॉवरमध्ये फ्लॅटही आलिशान आहे. त्यातील एक फ्लॅट बॉलीवूड स्टार रणबीर कपूर याने भाड्याने घेतला आहे. हा फ्लॅट पुण्यातील Duro Shox Pvt Ltd या कंपनीचा आहे. या कंपनीकडून रणबीर कपूर याने फ्लॅट घेतला आहे.

ट्रम्प टॉवरमधील सर्वच फ्लॅट लक्झरी आहेत. या फ्लॅटचे भाडे किती असणार? हा विचार तुम्ही करत असणार. नक्कीच लाखोंच्या घरात या फ्लॅटचे भाडे आहे. वर्षाला 48 लाख रुपये म्हणजे महिन्याला 4 लाख रुपये भाडे आहे. या फ्लॅटच्या वर्षाचे जे भाडे आहे, त्या रक्कमेत मध्यमवर्गीय व्यक्ती फ्लॅट विकत घेतो.

मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार रणबीर कपूर याने तीन वर्षांसाठी हा फ्लॅट भाड्याने घेतला आहे. या फ्लॅटचे पहिल्या वर्षाचे भाडे 4 लाख रुपये, दुसऱ्या वर्षाचे भाडे 4.20 लाख रुपये तर तिसऱ्या वर्षाचे भाडे 4.41 लाख रुपये असणार आहे. 23 मजली इमारतीत हा फ्लॅट दहाव्या मजल्यावर आहे.