
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्त असेल. आज तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. आई-वडिलांसोबत नातेवाईकांच्या घरी जावं लागेल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

आज आपल्या कामात सावध राहण्याची गरज आहे. आज खरेदीसाठी घराबाहेर पडण्यापूर्वी वस्तूंची यादी तयार करा. फसवणूक होण्याची शक्यता आहे. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

घरात दूरचे नातेवाईक येण्याची शक्यता आहे. आजची संध्याकाळ कुटुंबासोबत घालवली जाईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.

ऑफिसला जाताना सामान आणि महत्त्वाची कागदपत्रे घ्यायला विसरू नका. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा होणारी कामं होणार नाहीत. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.

आज तुमचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका, मेहनतीने काम करा. व्यवसायात पैशाची प्रकरणे गुंतागुंतीची होऊ शकतात. आज तुम्हाला प्रत्येक बाबतीत बारकाईने लक्ष द्यावे लागेल. शुभ अंक 18 आणि शुभ रंग पांढरा राहील.

रोजच्या दिवसापेक्षा आजचा दिवस थोडा वेगळा असेल. आवश्यक तिथे तडजोड करावी लागेल, याचा तुम्हाला खूप फायदा होईल. तब्येतीची काळजी घ्या. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.

आज तुम्ही तुमच्या कामाचा पाठपुरावा करू शकता. तुमचे प्रेझेंटेशन आणि प्लान कोणाकडेही मांडण्यापूर्वी एकदा तपासून पहा. काही कामासाठी तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. शुभ अंक 9 आणि शुभ रंग हिरवा राहील.

आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही वेगळे अनुभव येऊ शकतात. अधिकाऱ्यांसमोर तुमचे मत मांडण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कौटुंबिक बाबतीत मोठा निर्णय घेऊ शकता. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)